पक्षश्रेष्ठीचे आदेश येताच जि.प. उपाध्यक्षपदाचा राजीनामा देईल ; केशवराव तायडे यांचा दावा

Foto
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेतील शिवसेनेशी असलेली युती तोडा अशी घोषणा केली. त्या अनुषंगाने त्यांचे आदेश येताच जिल्हा परिषदेत शिवसेनेशी असलेली युती तोडून उपाध्यक्षपदाचा राजीनामा देईल असा दावा जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे यांनी सांजवार्ताशी बोलताना केला.
 
जिल्हा परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती केशवराव तायडे यांनी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या आदेशाने शिवसेनेशी युती करून सत्तास्थान प्राप्त केले होते. परंतु आता भाजप आणि शिवसेनेने राज्य पातळीवर युती केल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये काँग्रेसने शिवसेना-भाजप पक्षाशी केलेली युती तोडावी असा आदेश दिल्याने शिवसेना आणि काँग्रेस पक्षातील सत्ताधिशांना अडचण निर्माण झाली आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषदेत भाजपच्या सर्वाधिक २३ गटांमधुन विजय झालेला आहे. यामुळे या पक्षाचाच अध्यक्ष होईल हे निश्‍चित होईल हे निश्‍चित होते. शिवसेनेला मात्र हे न पटणारे  असल्याने त्यांनी १६ जागेवर निवडून आलेल्या काँग्रेसला जवळ केले व उपाध्यक्षसह आरोग्य व शिक्षण सभापतीपद देऊन युती केलही व अध्यक्षपदी अ‍ॅड. देवयानी डोणगावकर यांना विराजमान केले. अपवादात्मक मतभेद ठेवून गत अडीच वर्षापासून जिल्हा परिषदेत शिवसेना व काँग्रेस युतीची सत्ता सुरळीत सुरु होती परंतु आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांनी युती तोडण्याचे आदेश दिल्याने पदाधिकार्‍यांची अडचण झाली आहे. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker